
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात ३९६ व्या शिवजयंतीनिमित्त वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे समन्वयक निंबाजी शिंदे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील होते. समवेत सर्व संचालक, पदाधिकारी, प्राचार्य पी. जी. माने, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. वत्कृत्व स्पर्धेत स्वरूप योगेश दुकळे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंची विद्यार्थ्यांनी साकारली वेशभूषा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. प्रास्ताविक पी. एम. थोरे यांनी केले, सूत्रसंचालन ए .म. साळुंके यांनी केले, तर आभार एन .एस. अहिरे यांनी मानलेत.
