
पिंपळगाव बसवंत ( प्रतिनिधी ) दिनांक 19 फेब्रुवारी 2026 जिल्हा परिषद शाळा कुंदेवाडी येथे शिवजयंती निमित्त सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी शिवजयंतीचा उत्सव जल्लोषात साजरा केला. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री.मंगेशभाऊ भुजबळ आणि शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय श्री.विलासजी काळे तसेच ज्येष्ठ नागरिक श्री.तुपे सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले.

माजी शिक्षिका श्रीमती कविता पाटील यांनी शाळेला शिवाजी महाराजांचा पुतळा सप्रेम भेट दिला, त्याचेही मुख्याध्यापिका सौ.शिंदे मॅडम आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण व पूजन झाले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारे भाषणे केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवरायांवरील विविध नृत्यही सादर केले.श्री.विद्याधर तायडे सरांनी पोवाडा व गीत गायन केले.आजच्या पिढीला शौर्याचे धडे देण्यासाठी शाळेमध्ये श्री जाधव सरांचे शौर्य पथक यांनी लाठी-काठीचे शौर्य दाखविणारे प्रात्यक्षिके सादर केले.जि.प.शाळा कुंदेवाडी येथील माजी विद्यार्थी असणारे शनेश्वर महाराज तरुण मित्र मंडळ यांनी शिवजयंती उत्सव साजरा करताना ध्वनीप्रदूषण न करता, शिवरायांचा इतिहासाची प्रेरणा घेऊन तरुणाईला आदर्श निर्माण करण्याचा पायंडा पाडला.ही अतिशय स्पृहणीय बाब आहे.डिजेचा वापर न करता त्या खर्चाला आळा घालून, त्याच रकमेतून जि.प.शाळा कुंदेवाडी शाळेसाठी एक्वा वॉटर प्युरिफायर संच सप्रेम भेट दिला .त्यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल, मुख्याध्यापिका , शिक्षकवृंद,गावकऱ्यांनी व शालेय व्यवस्थापन समितीने त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. विलास भाऊ काळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यांनी विद्यार्थ्यांना मिठाई वाटप केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती लायरे मॅडम यांनी केले, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती महाजन मॅडम यांनी केले.शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी मा. वैकुंठ भाऊ पाटील,मा.श्री.अभय बलदोटा, मा.श्री.विनोद मोरे,मा.विनोद ढमे,मा.श्री.बाळासाहेब ताडगे,मा.श्री.दिपक घेगडे, श्री.सचिन भालेराव सौ.कविता बलदोटा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे व सर्व शिक्षक वृंद,उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवरायांची आरती झाली. आरती करून आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली. श्रीमती.पाटील मॅडम यांनी उपस्थित मान्यवर,ग्रामस्थ पालक, विद्यार्थी या सर्वांचे शब्द सुमनांनी आभार मानले.नाविण्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वांनी कौतुक केले.
