
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष ईम्यन्युएल मॅक्रोन यांच्यातील ऐतिहासिक भेटीदरम्यान गुरुवारी मॅक्रोन यांच्या जिभेवर ठिकपुर्ली ता. राधानगरी येथील अस्सल दुधाच्या गोड बर्फीचा आस्वाद घेतला. कोणत्याही कृत्रिम रंगाचा वापर न करता तयार झालेल्या या पारंपरिक बर्फी ने तपासण्याचे कडक टप्पे पार केल्यानंतर परदेशी पाहुण्यांना व त्यांच्या शिष्टमंडळाला बर्फी ने तृप्त केले.
फ्रान्सचे अध्यक्ष ईम्यन्युएल मॅक्रोन हे सध्या भारत दौऱ्यावर असून ते मुंबई वास्तव्यास आहेत त्यांच्यासाठी लोक भवनाच्या वतीने भारतातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची ऑर्डर देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे ठीकपूर्लीतून दहा किलो बर्फी बनवून घेतली आणि रविवारी मुंबईला रवाना केली मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने बर्फीची तपासणी केल्यानंतर मेजवानी त्यांचा समावेश करण्यात आला.
बर्फी समोर बसून बनवुन घेतली
बर्फीची मागणी येताच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वतः यात जातीने लक्ष घालून राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोर ती बनवून घेण्यास सांगितली . तलाठी ज्योतिराम महादेव शिंदे यांनी पारंपारिक बर्फी व्यावसायिक संदीप ढेंगे यांच्याकडून ती बनवून घेतली बर्फी मध्ये कोणतेही प्रिझव्हटिव्ह घातले जात नाहीत. फक्त दूध आटवून त्यात साखर घातली जाते व त्याच्या वड्या पाडल्या जातात तलाठ्यासमोर ही बर्फी बनवून त्याचे पॅकिंग करण्यात आले ते स्वतः ( ज्योतिराम शिंदे )बर्फी देण्यासाठी मुंबईला गेले होते. या प्रक्रियेत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी समन्वयाचे काम केले.
