
लासलगाव ( प्रतिनिधी) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, प्रा.दीपाली कुलकर्णी, प्रा.अश्विनी पवार,रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.पुनम आहेर, श्री.सुनिल खुटे, श्री.सुभाष शिरसाट इ. उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी प्रा.किशोर गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व योगदानाचे महत्व सांगुन, महाराजांचे मावळ्यांमधील देशप्रेम, एकनिष्ठता, धाडस या तत्वांना आत्मसात करण्याचा संदेश दिला. शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. त्यांनी स्वराज्यासाठी लढा दिला होता. त्यांचे विचार हे दिशादर्शक होते. आजच्या काळातही त्यांचे विचार मोलाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. डॉ.प्रदीप सोनवणे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगतांना महाराजांची रयतेविषयी जाण, आत्मीयता, स्वराज्याचा दूरदृष्टीकोन, राजनीतीमुळे त्यांचे कार्य अजरामर आहे. म्हणून छत्रपतींचा जीवन आदर्श विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा असा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिल गायकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे व स्वयंसेवक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांची विशेष मार्गदर्शन लाभले.
