
जनता इंग्लिश स्कूल सायखेडा विद्यालयामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतांना उपस्थित मान्यवर, प्राचार्य,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी.
सायखेडा( प्रतिनिधी)|मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता इंग्लिश स्कूल सायखेडा विद्यालयामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नितिन गावले हे होते. यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगावचे सदस्य श्री जगनआप्पा कुटे, श्री रामा कुटे, श्री अश्पाक शेख, श्री बबनराव कमानकर, श्री वसंत खालकर, विद्यालयाचे प्राचार्य श्री रामदास वाजे उपमुख्याध्यापिका श्रीमती अलका अहिरे , पर्यवेक्षक श्री सोमनाथ पगार वाणिज्य विभाग प्रमुख श्री संधान सर विज्ञान विभागप्रमुख श्री हारदे सर, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री कांडेकर सर, व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तींचे पुजन व दिपप्रज्वलन करुन सामुहिक आरती करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली, त्यानंतर विद्यालयाच्या गीतमंचाने महाराष्ट्रगीत सादर केले. यावेळी विद्यालयाच्या वतीने मा.प्राचार्य यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य श्री वाजे सर यांनी प्रास्ताविक केले,छत्रपती शिवाजी महाराज यांचे गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे.

शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहे हे सांगितले. त्यानंतर गीतमंचाने माझ्या राजाची जयंती आली व चाकर शिवबाच होणार ही गीते सादर केली. अभिनव बालविकास मंदिर विद्यालयाच्या चिमुरड्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत गीतांवर छान नृत्य सादर केले. शिवव्याख्याते सुदाम खालकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिवगर्जना सादर केली. विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. इ८ वी ब कु.अनुष्का खालकर हिने शिवचरीत्राविषयी अतिशय छान माहिती सांगितली,तसेच कु. श्रृतिका डेर्ले हिने मनोगत व्यक्त केले.

शिक्षक मनोगतात प्रा. श्रीमती मनिषा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सांस्कृतिक समिती प्रमुख श्री ज्ञानेश्वर कर्पे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले.कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन श्री. महाले सर/ श्रीमती कापडी मॅडम यांनी केले. सुत्रसंचलन श्री.अवधूत आवारे यांनी तर आभार श्री अशोक टर्ले यांनी मानले.
