
नांदगाव (प्रतिनिधी): आनंदनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी नांदगाव नगर परिषदेच्या गटनेत्या स्वातीताई नावंदर, महिला व बालकल्याण सभापती अॅड. विद्याताई कसबे, योगिताताई खरोटे, नगरसेविका कल्पनाताई जगताप व राखीताई जाधव यांच्या हस्ते प्रतिमापूजन पार पडले. त्यानंतर उपस्थित नागरिकांना मिठाई वाटप करून शिवजयंतीचा आनंद साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडीच्या नेहाताई कोळगे, विजया चतुर, आशाताई पाटील, जयाताई जगताप, तसेच नगरपालिकेच्या गरुड मॅडम, उषाताई शिंदे, ज्योती परदेशी, मनीषा काकळीज़ आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आनंद पवार, रवी सोनवणे, सनी कावळे, सागर अडकमोल, पंकज जगताप, राहुल मेंगणार, शरद आयनोर, सुनील मेंगणार, गणेश सरग, दीपक भिसे, विशाल निकम, कुणाल आहेर, शुभम जाधव, मनोज तांबे, जय तांबे, बिरूभाऊ शिंदे, विशाल वडगुले, रोहित जाधव, प्रभाकर घोडके, आकाश सोनवणे, रोहित सोनवणे, ऋषीं करवंदे आदींची उपस्थिती लाभली.

आनंदनगर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसरात शिवभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
