
नाशिक ( प्रतिनिधी )दि एज्युकेशन
इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत आज गुरुवार दि.१९/०२/२०२६ रोजी ३९६ वा शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर व शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी मॅडम यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.श्री विजय सरोदे सर यांनी शिवगर्जना दिली.बालशिवाजीचा सुंदर पाळणा इ.६ वीच्या विद्यार्थिनींनी नृत्यातून सादर केला.त्यांना मार्गदर्शन श्री विजय सरोदे सर व सौ.लता शिंदे मॅडम यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी मॅडम यांनी यावेळी जिजाऊंच्या भूमिकेतून शिवजन्माचा डोहाळे व जिजाऊंचे महत्त्व सांगतांना जिजाऊंनी एका सामान्य मावळ्याला छत्रपती बनविण्याचे लाखमोलाचे कार्य केले,ज्यामुळे मराठी साम्राज्याचा पाया रचला गेला.त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु व प्रेरक शक्ती होत्या.त्यांनी बाल शिवबांना रामायण-महाभारतातील पराक्रमाच्या गोष्टी सांगून अन्यायाविरुद्ध लढण्याचे व रयतेचे रक्षण करण्याचे बाळकडू दिले.विश्वास या प्राणप्रिय घोडयाचे महत्त्व गोष्टीतून कथन करुन हिंदवी स्वराज्य निर्माण करुन प्राण्यांना जीव लावणारा हा जनतेचा राजा व श्रीमान योगी होता.तसेच १६ व्या शतकातील महत्त्व सांगून जिजाऊंनी विचार केला व शिवरायांनी तो कृतीत आणले,असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शाळेचे उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर यांनी मनोगतातून पन्नास वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीनंतर जगात सर्वोत्तम गणला गेलेला एक महान राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज.शिवाजी महाराजांना समजून घेतांना त्यांना एक उत्कृष्ट प्रशासक,लोककल्याणकारी राजा म्हणून बघितले पाहिजे.त्यांनी नुसती स्वप्ने बघितले नाही तर कार्याला महत्त्व दिले.त्यासाठी अहोरात्र कष्ट करून व ती स्वप्ने सत्यात उतरविले.पुढे त्यांनी शिवाजी महाराज हे अतुलनीय शौर्य,मुत्सद्देगिरी,दूरदृष्टी आणि उत्तम चारित्र्याचे धनी होते.त्यांचे जीवन हे शौर्य नितिमत्ता आणि देशप्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.तसेच संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर यांना यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जीवन व कार्य हे ग्रंथ भेट दिले.शेवटी शिवगर्जना देऊन अभिवादन केले.
ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मा.श्री मिलिंद कोठावदे सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग यावेळी सांगितले.स्त्रियांवरील अन्यायावर वाचा फोडणाऱ्या शिवरायांची गौरवगाथा,शिवरायांचे बालपण व जिजाऊंचे संस्कारांचे महत्त्व त्यांनी कथन केले.जिजाऊंचे संस्काराचे महत्त्व सांगतांना स्त्रियांना नाचवणारे शिवबा नको तर मला स्त्रियांना वाचवणारे,अन्यायाविरुद्ध लढणारे शिवबा हवे आहे.तसेच जिजाऊंनी शिवबाला रामायण,महाभारत,अभंग व राजकारण नव्हे तर राजनिती कशी असावी यांचे धडे गिरवले.पुढे सरांनी आपल्याला एखाद्याचे मन जिंकता येत नाही,परंतु शिवबाने संपूर्ण जनतेच मन जिंकले.छत्रपती ही एक व्यक्ती नाही तर ती एक विचारधारा आहे.आणि आज शिक्षकासमोर ती एक आदर्श विचारधारा उभी करण्याची सर्वात मोठी जबाबदारी आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नियोजन श्री पंकज अहिरे सर व श्री प्रविण मुळे सर यांनी केले.सुत्रसंचालन श्री पंकज अहिरे सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री जालिंदर वायकंड़े सर यांनी केले.फलकलेखन सौ.सायली मुळे मॅडम यांनी केले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी साहेब,सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी मॅडम,अधिक्षिका मा.सौ.मीना वाळूंजे मॅडम,उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मा.श्री मिलिंद कोठावदे सर,पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे मॅडम,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल सर,सौ.भारती चंद्रात्रे मॅडम,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

