
नांदगाव( प्रतिनिधी) सोहळा हिंदवी स्वराज्याचा, सोहळा रयतेच्या राजाचा—या भावपूर्ण घोषणेसह १९ फेब्रुवारी रोजी व्ही.जे. हायस्कूल येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व शिवगर्जनेने करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मा. डॉ. नांदुरकर यांनी केले. आपल्या भाषणातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा व हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा सविस्तर आढावा घेतला.

यानंतर इयत्ता आठवी ‘अ’च्या विद्यार्थिनी कु. सिद्धी मानकर, कु. वैष्णवी निकम व कु. किशोरी मोकळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता आठवी ‘अ’च्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कुणाल जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत स्वराज्य स्थापन करताना आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात व सहकाऱ्यांना सोबत घेऊन उभारलेले स्वराज्य याबाबत प्रेरणादायी प्रसंग सांगितले.
यानंतर अकेडेमिक बोर्ड सदस्य सौ. रुपाली झोडगेकर यांनी विद्यार्थ्यांना महाराजांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास अकेडेमिक बोर्ड सदस्य भास्कर मधे, शिक्षक प्रतिनिधी प्रवीण अहिरे, ज्येष्ठ शिक्षक विलास काकळीज, चंद्रकांत दाभाडे, श्रीमती सुनीता देवरे, सांस्कृतिक प्रमुख श्रीमती संगीता शिंदे तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवी ‘अ’च्या विद्यार्थिनी कु. निरजा वाघमारे हिने केले तर आभार प्रदर्शन कु. रूपाली शिंदे हिने केले.
शिवगर्जना द्विवीज विक्रम घुगे यांनी सादर केली, तर बाल शिवाजीची भूमिका अद्विका चव्हाण व गिरीश औशिकर यांनी साकारली.

एकूणच शिवजयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व उत्साहवर्धक ठरला.
