
सिन्नर (वसंत गोसावी, प्रतिनिधी ) : पाटोळे (ता. सिन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती उत्साहात संपन्न
पाटोळे ता.सिन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. गावात शिवभक्तीचा जल्लोष आणि देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.कार्यक्रमास शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे संस्थापक सोपान खताळे, सरपंच सौ. संगिताताई आव्हाड, उपसरपंच सौ. गितांजली कराड, ग्रामपंचायत सदस्य देविदास कराड, सुनिल सांगळे, माजी सरपंच मेघराज आव्हाड, रामहरी खताळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदाम पानसरे, निवृत्ती कराड, ब्रम्हनाथ फ्रेंड सर्कल व शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून भव्य प्रभातफेरी काढून वातावरण शिवमय केले. छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गावातील मुख्य चौकात “एकच राजा इथे जन्मला” या गीतावर लेझीम नृत्य सादर करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रभावी सांस्कृतिक सादरीकरण झाले.आरोही खताळे हिने शिवरायांची गारद सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्वरा कराड हिने इंग्रजीतून प्रभावी भाषण केले. वेदांत खताळे व काजल खताळे यांनी शिवचरित्रावरील माहिती सादर केली, तर श्रुती आंधळे हिने “आधुनिक सोशल मीडियाचे फायदे-तोटे” या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मेघराज आव्हाड, नवनाथ आंधळे, सोपान खताळे, सुदाम पानसरे, सुरज कराड, रामहरी खताळे, रामभाऊ कराड, संदीप खताळे, दत्तात्रय खताळे, रमेश खताळे, शिवाजी खताळे आदींनी रोख स्वरूपात देणगी दिली.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली. मुख्याध्यापक वसंत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिता बर्वे, कैलास पवार, मीना सोनवणे, स्वाती खताळे, प्रतिभा पवार, सुनिता खताळे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कैलास पवार यांनी सूत्रसंचालन केले. पाटोळे ग्रामपंचायत व ब्रम्हनाथ फ्रेंड सर्कल यांच्या वतीने विद्यार्थ्यांना नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली.शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान, देशभक्तीची प्रेरणा आणि सामाजिक जाणीव जागृत करण्याचा हा उपक्रम निश्चितच यशस्वी ठरला.
