
सिन्नर ( प्रतिनिधी)१९ फेब्रुवारी २०२६ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी जगातील पहिली शिवजयंती साजरी केली. प्रथम त्यांनी रायगडा वरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर पहिला पोवाडा लिहिला तसेच त्यांचा इतिहास जगासमोर यावा यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व आठरा पगड जाती-जमाती धर्मातील लोकांना एकत्र आणले. त्यांची लढाई कुठल्याही जाती धर्माविरुद्ध नव्हती तर रयतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात होती. आपल्या माणसांवर अन्याय अत्याचार होत होता म्हणून त्यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले शिवाजी महाराजांचं आपल्या या मावळ्यांवर खूप प्रेम होतं ते फक्त त्यांचे साथीदार नसून महाराज मावळ्यांना स्वतःच्या कुटुंबाचा भाग समजत असत त्यांच्या आनंदाच्या, दुःखाच्या प्रसंगी महाराज त्यात सामील होत असत. पुढे मावळ्यांच्या सहकार्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांमधील नाते हे अतूट विश्वास, प्रेम, मैत्रीचे आणि निष्ठेचे होते. महाराज आपल्या मावळ्यांशी समानतेने वागत, त्यांच्या मतांना महत्त्व देत, आणि त्यांच्या कष्टांची कदर करत. महाराजांनी आपल्या नेतृत्वाने मावळ्यांना प्रेरित केले, त्यांना स्वराज्याच्या उद्दिष्टांशी जोडले, आणि त्यांच्या क्षमतांचा स्वराज्यासाठी उपयोग करून घेतला. मावळ्यांचं सुद्धा शिवाजी महाराजांवर खूप प्रेम होतं.मावळे प्रेमाने त्यांना शिवबा म्हणत असत.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात अन्याय अत्याचाराला थारा नव्हता.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे यावा यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला आणि पूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती जोरदार साजरी होऊ लागली. तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं त्यासाठी शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जी परंपरा आजही चालू आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची प्रेरणा आज जग घेत आहे.अशा महान रयेतेच्या राजाला विनम्र अभिवादन!
या कार्यक्रमाचे सुञसंचलन शिवा सातभाई यांनी केले.व प्रास्थाविक विजय मुठे यांनी केले.तर आभार राजेंद्र बेंडकुळे यांनी मानले
यावेळी श्रद्धा सोनवणे अनुष्का कदम पुजा पाटील महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे शिवा सातभाई राजेंद्र बेंडकुळे खेतन मुठे नारायण परदेशी अजय लोंढे माऊली चांदणे सुरेश ढवळे संतोष खैरे,शाम डांगे, आकाश धोंगडे, किरण मुठे,रोहित मुठे हरीभाऊ लोणारे आदि उपस्थित होते
