
मुळडोंगरी ( प्रतिनिधी ) संत सेवालाल सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय एस्.जी. राठोड साहेब, सचिव सिद्धांत दादा राठोड व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे एस एस मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांना पुष्पगुच्छ व पेन भेट म्हणून दिले. तसेच शाळेसाठी शालेय वस्तू ठेवण्यासाठी कपाट भेट म्हणून दिले.यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगतातून आठवणींना उजाळा दिला. काही विद्यार्थ्यांचे वैशिष्टकांचे मनोगत ऐकताना डोळे पाणावले. तसेच भाषणादरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे मॅडम यांनी मार्गदर्शन पर भाषणात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व प्रामाणिकपणा ,शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य साठी शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे दहावीचा शुभेच्छा समारंभ आनंदात पार पडला. शुभेच्छा समारंभामुळे शाळेच्या वातावरणात आनंदा सोबत विरहाची छटा दिसून आली.
