सायखेडा ( प्रतिनिधी ) दिनांक 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणारी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेची आसन व्यवस्था जनता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सायखेडा केंद्रावर जाहीर करण्यात आली . या केंद्रात एकूण 385 विद्यार्थी प्रविष्ट होणार असून , 16 ब्लॉक मध्ये आसन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ब्लॉक मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आली असून ,संपूर्ण केंद्र परिसरावर सीसीटीव्ही कॅमेरे ची नजर असणार आहे. या परीक्षा केंद्रावर शिंगवे, भेंडाळी ,सायखेडा, रामनगर, चाटोरी येथील विद्यार्थी असणार आहे,परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती केंद्रप्रमुख श्री. रामदास वाजे यांनी यांनी दिली आहे.