
ओझर: दि.18 वार्ताहर
ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालय केंद्र 1430 ची एसएससी परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 ची आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. या केंद्रावर नवीन इंग्रजी शाळा, बोरस्ते विद्यालयाचे परीक्षेसाठी नियमित 451 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. परीक्षा क्रमांक डी झिरो 70002 ते डी झिरो 71402, 71445 आणि डी 400171 ते डी 400177 पर्यंतच्या विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था नव्या व जुन्या इमारतीत वरच्या मजल्यावर करण्यात आल्याची माहिती केंद्र संचालक प्राचार्य सोपान वाटपाडे यांनी दिली. परीक्षेस विद्यार्थ्यांनी पाण्याची बाटली व परीक्षा पत्राशिवाय कोणतेही साहित्य सोबत आणू नये असे आवाहन केंद्र संचालक प्राचार्य सोपान वाटपाडे यांनी केले आहे.
