
*१७ फेब्रुवारी २०२६ क्रांतिगुरू लहुजी उस्ताद साळवे यांची १४५ व्या स्मृतीदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे आभिवादन करण्यात आली*या कार्यक्रमाची सुरवात क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले.*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की* पहिले क्रांतिकारक सत्यशोधक उस्ताद लहुजी साळवे यांचा जन्मदिन: पेशवाईच्या समाप्तीनंतरही पुण्यात ब्राह्मणांचा प्रभाव कमी झाला नाही. इंग्रजांच्या राजवटीतही अस्पृश्यता शिगेला पोहोचली होती. ज्यांनी शूद्रांवर आणि अतिशूद्रांवर जातीय अत्याचार केले होते ते आता ब्रिटिश प्रशासनात नोकर म्हणून तिथे काम करत होते.त्याच वेळी, सुरुवातीचे क्रांतिकारी सत्यशोधक उस्ताद लहुजी साळवे जी यांनी ब्रिटिश आणि युरेशियन या दोन परदेशी लोकांविरुद्ध चळवळ सुरू केली

.पहिले *क्रांतिकारी उमाजी राजे व आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले* यांच्यापर्यंत झालेल्या संघर्षाचे ते सक्रिय नेते होते.तलवार आणि लेखणी, शारीरिक ताकद, बौद्धिक ताकद, मनोबल, संघ ताकद आणि आर्थिक ताकद या दोन्हींचा वापर करून ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्यासोबत उभे राहिले.महिला शिक्षणाच्या कामात ब्राह्मण शक्य तितके अडथळे निर्माण करत होते, त्यांना धमकावण्याचे आणि मारण्याचे प्रयत्न केले जात होते, जेव्हा अस्पृश्य मुलींसाठी शाळा सुरू झाल्या, फुले जातिव्यवस्थेच्या पायावरच घाव घालत होते, तेव्हा पहिले क्रांतिकारी सत्यशोधक उस्ताद लहुजी साळवे त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांचा पाठिंबा ही एका मोठ्या क्रांतीची सुरुवात होती.अशा क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन *या कार्यक्रमाचे सुञसंचलन रुपेश मुठे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.व राजेंद्र बेंडकुळे आभार यांनी मानले*याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,मा.नगरसेवक रूपेशभाऊ मुठे राजेंद्र बेंडकुळे बाळासाहेब जाधव माऊली चांदणे योगेश मोरे रामदास कुटे सागर चंदनकर किरण मुठे प्रकाश गुंजाळ शाम डांगे आकाश धोंगडे चंद्रभान वारुंगसे आदि उपस्थित होते
