
. सिन्नर (प्रतिनिधी ) ४ एप्रिल२०२५ आदिवासी विरांगणा झलकारीबाई यांच्या १६७ व्या स्मृतीदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे राष्ट्रपिता महात्मा फुले स्मारक सिन्नरबस स्थानक शेजारी* *राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या पुतळ्यास व आदिवासी विरांगणा झलकारीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले* १८५७ मध्ये झाशीच्या किल्ल्यावर इग्रंजानी हल्ला केला. राणीच्या सेनानायक इंग्रजांशी फितुर झाला होता. त्याच्या मदतीने किल्ल्यापर्यंत पोहोचण्यात इंग्रजांना यश आले.जेव्हा राणीला चोहोबाजुनी घेरण्यातआले तेव्हा झलकारी बाई त्यांना म्हणाली होती, ‘तुम्ही सुरक्षित स्थळी पोहोचा, मी तुमच्या जागी लढते.’ नंतर राणी लक्ष्मीबाई किल्ल्याच्या बाहेर पडल्या आणि त्यांची वेशभुषा करुन राणी झलकारी बाई लढल्या. – इंग्रज जनरल रोज याला यासंबंधीची सर्व माहिती कळाली तोपर्यंत राणी लक्ष्मीबाई किल्ल्यातून बाहेर जाण्यात यशस्वी झाल्या होत्या. नंतर झलकारी बाई यांना पकडण्यात आले. तेव्हा जनरल त्यांना म्हणाला, ‘तु पागल आहेस. तुझ्यासारखेच हिंदुस्थानातील लोक पागल झाले तर आमचे येथे राहणे मुश्किल होऊन जाईल.’-झाशीचा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून झलकारीबाई ब्रिटिशांविरुद्ध प्राणपणाने लढली.शत्रूला शरण न जाता झलकारीबाई देशासाठी शहीद झाली.*जा कर रण में ललकारी थी,वह तो झांसी की झलकारी थी|*गोरों से लड़ना सिखा गई,है इतिहास में झलक रही,वह भारत की ही नारी थी*|अशी धाडशी विरांगणा अखेरपर्यंत इंग्रजांविरुद्ध लढत राहिली त्यातच त्यांना वीरमरण आले जेव्हा इंग्रजांना माहिती झाले की ज्या महिलेने त्याना युध्दात सळो कि पळो करून सोडले होते ती महिला राणी लक्ष्मीबाई नसून झलकारीबाई होती तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला भारत सदा ही अशा नारींचा सन्मान सदैव करेल म्हणून भारत सरकारने तिच्या कार्याची दखल घेऊन २२जुलै २००१ रोजी झलकारीबाईच्या नावाने पोस्टाचे तिकीट सुरू केले.अशा या महान विरांगणेला विनम्र अभिवादन!तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील राष्ट्रभक्तीपर चित्रपट निर्माते दिवंगत मनोजकुमार यांच्या दिर्घ आजाराने नुकतेच निधन झाले त्यांच्या चित्रपट कारर्कीदीचा आढावा घेवून महामित्र दत्ता वायचळे यांनी आदरांजली वाहिली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे,सुनिल कुऱ्हे,विजय मुठे अमोल गवारी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्याक्रमाचे सुत्रसंचलन बाळनाथ कार्ले प्रास्ताविक विजय मुठे तर आभार निवृत्ती भांगरे यांनी मानले याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे माजी नगरसेवक रूपेशभाऊ मुठे आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे मार्गदर्शक निवृत्ती भांगरे सहसंस्थापकट विजय मुठे,ट्रायबल आर्मी अध्यक्ष अमोल गवारी, सुनिल कुर्हे,बाळनाथ कार्ले, भानुदास मुठे,बाळासाहेब मुठे,सचिन देशमुख, अजय लोंढे शिवाजी सातभाई सुनिल सातभाई
