
जळगाव निंबायती (वार्ताहर) मालेगाव येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात वार्षिक गुणगौरव समारंभात मराठी संशोधक केंद्राचे संशोधक विद्यार्थी संजय प्रभाकर बच्छाव यांचा उच्चशिक्षित व पात्रता परीक्षेत मिळालेल्या यशासाठी प्रमुख पाहुणे जेष्ठ कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त व प्राचार्य डॉ एस .बी जगदाळे. मसगा महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे विश्वस्त डॉ. सुभाष निकम, उपप्राचार्य डॉ. अनिल सावळे, डॉ. मनीष सोनवणे डॉ .डी .एम. सोनवणे, डॉ. सुषमा तिवारी, प्रा. अजिंक्य ठाकरे , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मिलिंद कुलकर्णी आणि पर्यवेक्षक प्रा.रवींद्र मोरे उपस्थित होते. मराठी संशोधन केंद्र प्रमुख डॉ.अरुण पाटील, मराठी विभाग प्रमुख डॉ. अर्जुन नेरकर, डॉ गजानन भामरे, डॉ. विनोद गोरवाडकर ,डॉ. सपना सोनवणे ,डॉ संतोष कन्नोर यांनी अभिनंदन केले. संजय बच्छाव हे नांदगाव तालुक्यातील माध्यमिक विद्यालय पांझणदेव येथे गणित व विज्ञान शिक्षक असून तालुका विज्ञाना अध्यापक संघाचे अध्यक्ष, गणित अध्यापक संघाचे उपाध्यक्ष, टी.डी.एफ संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख, नाशिक जिल्हा समन्वय समितीचे कार्यकारणी सदस्य,तसेच इन्स्पायर अवार्ड मानक नांदगावचे समन्वयक आहेत. बच्छाव हे ३ विषयात नेट- सेट, ५ विषयात पदविका, ५ विषयात पदवी, ९ विषयात पदव्युत्तर पदवी, ३ विषयात पात्रता परीक्षा सेट व नेट उत्तीर्ण झाले असून, पुणे विद्यापीठ अंतर्गत मसगा महाविद्यालयात डॉ.स्नेहल मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी संशोधन केंद्रात पी.एच डी.संशोधन कार्य करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत हिवाळी व उन्हाळी सत्रात ४४ वेळा विद्यापीठीय परीक्षा दिली आहे.
