
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१८२ वा दिवस
ज्यांना शिवाची सेवा करावयाची आहे त्यांनी प्रथम शिवाच्या या संतानांची, जगातील या समस्त जीवाची सेवा केली पाहिजे. *"शिवभावे जीवसेवा"* जी व्यक्ती जास्त निःस्वार्थ तितकी ती अधिक धार्मिक व शिवाच्या अधिक निकट असते. स्वार्थी व्यक्तीने सार्या मंदिरांचे उंबरठे झिजविले, सार्या तिर्थक्षेत्राच्या वार्या केल्यात तरी तो शिवाच्या फार जवळ जाऊ शकत नाही. गरिब, दुर्बल व रोगी यांच्यामध्ये ज्याला शिव दिसतो तोच खरा शिवाचा उपासक होय. आणि ज्याला फक्त प्रतिमेतच शिव दिसतो त्याची उपासना केवळ प्राथमिक स्वरूपाची आहे असे समजावे. मानवसेवा हीच खरी माधवसेवा...
स्वामी विवेकानंद..
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास २६ शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६
★ महाशिवरात्री…शिवपूजन
★ वीर एकलव्य जयंती….
★ संत सेवालाल महाराज जयंती
★ १५६४ इटालियन खगोलशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचा जन्मदिन.
★ १९४९ दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्मदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
