
सिन्नर ( प्रतिनिधी ) १४ फेब्रुवारी २०२६भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री यांचा १७२ व्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार व संविधान प्रेमी यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार मालेने वंदना देण्यात आली तसेच भिम बाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी भिमाई यांच्या जयंतीनिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जन्म देणारी माता भीमाबाई आंबेडकर’, बाबासाहेब यांच्या जडणघडणीत वडील रामजी व आई भीमाबाई यांनी घेतलेले कष्ट, परिश्रम, व संस्कार यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यावेळी आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य दलित महार जातीचे होतो म्हणून त्यांना खूप त्यावेळी त्रास झाला त्या त्रासाला कंटाळून समाजातील लोकांना न्याय मिळावा यासाठी रामजी सपकाळ यांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले केला त्यांनी दिवस रात्र मेहनत करू आपल्या मुलाला उच्च शिक्षण दिले त्यांनी भिमाईला शब्द दिला होता की आपल्या मुलाला खूप शिकवीन व त्यांनी पूर्ण केला व सर्व भारतीय लोकांनी संविधान देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
यावेळी बाळासाहेब आव्हाड यांनी सामुदायिक बुद्ध वंदना व त्रिशरण घेण्यात आली
या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रभाकर जाधव यांनी केले.व प्रास्ताविक बाळासाहेब आव्हाड यांनी केले.तर आभार विजय मुठे यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे ,मा. नगरसेवक प्रभाकर जाधव ,बाळासाहेब आव्हाड, आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे ,राजेंद्र कटारनवरे ,धम्मपाल शिरसाठ, धोंडीराम जगताप, भुवनेश साळवी सोपन डगळे आदि.उपस्थित उपस्थित होते
