
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१८१ वा दिवस
आधुनिक युरोपच्या नवरचनेला प्राचीन हिंदुस्तानचे रसायनशास्त्र, त्यांच्या वैद्यकातील धातुसंयुगाचा उपयोग त्यांनी बसविलेली स्वरसप्तके त्यांनी लावलेला तंतुवाद्याचा शोध हे सर्व मोठे उपकारच झाले आहे. जगावर आपल्या मातृभूमीने मोठे ऋण करून ठेवले आहे. कोणत्याही देशाशी तुलना केली तरी सौम्यप्रकृतीच्या हिंदूने जगाचे जेवढे भले केले आहे तेवढे अन्य कोणीही केलेली नाही. केवळ ह्याच हिंदुस्तानच्या भूमीत धर्म हा आचरणीय वास्तव होता. इतर देशांत जीवणाची सुखे भोगण्याकरिता प्रसंगी आपल्याहून दुर्बलांची पिळवणूक करीत. या पिळवणूकीत स्त्री-पुरुष ज्याप्रमाणे अंधपणे स्वतःला झोकून देतात, तशाच बेभानपणे या भूमीतील लोकांनी आत्मशोधार्थ स्वतःला झोकून दिले आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास २५ शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६
★ १९२५ पूर्व केंद्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचा जन्मदिन.
★ १९३३ सुप्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेत्री मधुबालाचा जन्मदिन
★ १९५० सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रसिध्द वकील, केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपील सिब्बल यांचा जन्मदिन
★ १९५२ पूर्व केंद्रीय मंत्री, भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचा जन्मदिन
★ व्हॅलेंटाइन डे – मातृ पितृ पूजन दिन.
