
सिन्नर (वसंत गोसावी, प्रतिनिधी): कोनांबे (ता. सिन्नर) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील श्रद्धा डावरे हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर मंडल कृषी अधिकारीपदावर निवड मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल कोनांबे ग्रामपंचायत व श्री गुरुदत्त ट्रस्ट यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी मोहन डावरे होते. कार्यक्रमास सरपंच विष्णु गवारी, उपसरपंच परसराम डावरे, श्री गुरुदत्त ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोऱ्हे, प्रकाश डावरे, संतोष डावरे, अंबादास भागवत, उत्तम डावरे, एकनाथ वर्पे, बाजीराव डावरे, नाशिक सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन अशोक डावरे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी डावरे, माजी सरपंच मोहन डावरे, सुदाम डावरे, सिनेअभिनेते डॉ. सुयोग गोऱ्हे, सुदाम डावरे, तानाजी डावरे, त्र्यंबक डावरे, विष्णू डावरे, युवराज डावरे, दत्तू डावरे, दुर्गादास बैरागी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. राजेंद्र गोऱ्हे यांनी श्रद्धाच्या यशाचे कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रकाश डावरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.सर्वसामान्य ग्रामीण शेतकरी कुटुंबातील मुलीने कठोर परिश्रमांच्या जोरावर मिळवलेले हे यश गावातील तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहे. श्रद्धा डावरे हिच्या या यशामुळे कोनांबे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
