
सिन्नर (वसंत गोसावी, प्रतिनिधी): श्री सिन्नर दशनाम गोसावी समाज संस्था, सिन्नर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्त विशेष धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ९.३० वाजता सिन्नर येथील ऐश्वर्य मंदिर, सिन्नर येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे.
महाशिवरात्री हा भगवान शिव भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक पर्व मानला जातो. या दिवशी शिवपूजन, उपवास, जप-तप आणि स्तोत्रपठणाद्वारे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करतात. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात सामुदायिक शिवपूजन, आरती, स्तोत्रपठण, समाज मेळावा तसेच महाप्रसाद आदी धार्मिक उपक्रम पार पडणार आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात धार्मिक एकात्मता, बंधुभाव आणि अध्यात्मिक जागृती वृद्धिंगत करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. सिन्नर तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रविंद्र गिरी, सरचिटणीस वसंत गोसावी, शहर अध्यक्ष भैरवनाथ गोसावी, शहर सरचिटणीस काशिनाथ गोसावी, कार्याध्यक्ष गुलाब गोसावी, खजिनदार रतनपुरी गोसावी, सहचिटणीस रविंद्र गिरी, प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ गिरी, कार्यकारणी सदस्य ब्रह्मगिरी गोसावी, शरद गोसावी, छगन गोसावी, ईश्वर गोसावी, राजेंद्र गोसावी, ज्ञानेश्वर गोसावी, भाऊसाहेब गोसावी, सुधीर गिरी, नारायण गोसावी, सौ.दिपाली गोसावी, सौ. अर्चना गोसावी, सौ.शोभा गोसावी यांचेसह माजी तालुकाध्यक्ष भानुदासपुरी गोसावी, राजेंद्र गिरी, दिलीप गोसावी, सल्लागार त्र्यंबकगिरी गोसावी, उत्तम गोसावी, शामगिरी गोसावी आदींनी केले आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने सिन्नरमध्ये भक्तिमय वातावरणाची अनुभूती घेण्याची ही सुवर्णसंधी असून, शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
