
!वाचाल तर वाचाल!,शुक्रवार दि.०४/०४/२५रोजी कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील कैद्यांना त्यांचा वेळ सत्कारणी लागावा यासाठी याकरिता जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने पुस्तके भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कल्याण आधारवाडी कारागृहाचे उप.अधिक्षक यु.पी.पाटील,वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभिजीत कोळी यांजकडे संस्थाचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तके देण्यात आली.याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक अरविंद सुर्वे,महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षा सौ.श्रुती उरणकर,मुंबई अॅन्टीपायरसी सेलचे मुख्य तपाशी अधिकारी रामजित गुप्ता,कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण समितीचे माजी सभापती तसेच बिर्ला काॅलेजचे माजी.उप प्राचार्य प्रा.उदय सामंत,सेवा समाधान ट्रस्ट च्या विश्वस्त मानसी मोने,शब्दसुमने साहित्य मंच च्या अध्यक्षा अनिता कळसकर,बहिणाबाई ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल इंगळे, उत्कर्ष सेवा मंडळाचे सचिव विलास शिंदे उपस्थित होते.






