
ओझर दि.४ वार्ताहर येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात संस्थेचे माजी सरचिटणीस स्वर्गीय खासदार डॉ वसंतराव पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी केले. विद्यार्थ्यांनी डॉ पवार यांच्या जीवन कार्यावर भाषणे केली.

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. आपल्या भाषणात वाटपाडे यांनी डॉ पवार यांच्याबद्दल माहिती देताना संस्थेचे आधारस्तंभ खंबीर नेतृत्व निष्णात डॉक्टर शिस्त गुणवत्ता व पारदर्शकता जपणारे स्व कर्मवीर डॉ वसंतराव पवार यांच्या जीवन कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका शितल हंडोरे यांनी केले.
