
घोटी (प्रतिनिधी ):- घोटी येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच अभिनव बाल मंदिरमध्ये मविप्र संस्थेचे कर्मवीर आण्णासाहेब मुरकुटे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे तालुका संचालक ॲड. संदीप भाऊ गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य नितीन भामरे होते.व्यासपीठावर उपमुख्याध्यापक उल्हास पवार, पर्यवेक्षक हिरामण चौधरी,अविनाश निकम,हेमंत झोले ,नामदेव सरगर, अपर्णा उईके, देवयानी जगताप, कैलास पाचोरे,सोमनाथ गिरी , वरिष्ठ लिपिक जीवन शिंदे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे प्राचार्य नितीन भामरे म्हणाले की, कर्मवीर मुरकुटे यांनी मविप्र संस्थेसाठी अतिशय मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्या दुरदृष्टीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली .त्यांचे शेतीविषयक, सामाजिक,सहकार,राजकीय,शैक्षणिक आदींसह सर्वच क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे आव्हान प्राचार्य भामरे यांनी केले. यावेळी सत्येनं जाधव,श्रीमती. एस.ई. पवार, सविता जाधव,संपत शेंगाळ, राजेंद्र देवगिरे,गायत्री सूर्यवंशी, घनश्याम भालेराव,प्रकाश तांबे,अनिल काळे आदींसह शिक्षक,शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
