
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१८० वा दिवस
काही प्रसंगी कठोर टीका जरुरी असते पण ती काही काळच, सुयोग्य मार्ग मिळेपर्यंतच. गेल्या असंख्य वर्षांपासून फक्त टीकेचाच महापूर वाहत आहे भारतीयांच्या वैगुण्यावर पाश्चात्त्य बुद्धिवंतांनी भौतिक उपभोगवादी संस्कृतीने तोंडसुख घेतले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आपल्यातल्या चांगल्या गोष्टींपेक्षा आपले दोषच फक्त समोर येत आहेत. आता हे पुरे झाले. मी आपणास विधायक मार्ग दाखवणार आहे. जे विघातक आहे ते विसरून जा. यापुढे केवळ विधायक विचार व विधायक कार्यांला प्राधान्य द्यावे. टीका, टिप्पणी, निंदा, नालस्ती, द्वेष करण्याचा काळ आता संपला आहे. आपल्या समाजाच्या विस्कळीत समाजशक्ती एकत्र करून त्यात एकसूत्रीपणा आणू या. यातून आपला उत्कर्ष करुन घेऊ या.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास २४ शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी २०२६
★ विजया एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ १८७९ प्रभावी वक्त्या, कवयित्री, स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी नेत्या सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन.
★ १८९४ सुप्रसिध्द इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्मदिन
★ जागतिक रेडिओ दिन.
★ राष्ट्रीय जंतनाशक दिन.
