
पारितोषके प्राप्त खेळाडू आणि प्रमुख अतिथी जी. डी. पोखरकर, समवेत अशोक दुधारे, आनंद खरे, अशोक कचरे, दीपक निकम.
नाशिक (. प्रतिनिधी ) दिनांक १२ फेब्रुवारी : सहकार महर्षी मा. खासदार स्व. उत्तमराव ढिकले यांच्या जयंतीनिमित्त स्व. उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या वतीने आणि नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने नाशिकमध्ये भव्य कॅरम स्पर्धेचे आयोजन मेरी परिसरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, संभाजी महाराज चौक, तारवाला नगर, दिंडोरी रोड, नाशिक येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये १४ वर्षे, १९ वर्षे आणि १९ वर्षेवरील खुला गट पुरुष आणि महिला आणि जेष्ठ नागरिक पुरुष आणि महिला या आठ गटांचा होता.

या स्पर्धेत मोनाली धोत्रे, भूषण भटाटे, उत्कर्ष परदेशी, राम जयस्वाल, भूमिका वाघमारे, दिशाली बलदवा अशोक कचरे, संगीता मोरे यांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करत विविध गटांमध्ये विजेतेपद मिळविले. १४ वर्षे मुलांमध्ये अंतिम सामन्यात राम जयस्वाल याने संकेत चौहान याचा २-० असा पराभव करत विजेतेपद मिळविले या गटात कार्तिक गोडबोलेने तिसरा तर आदेश वसावे याने चवथा क्रमांक मिळविला. १९ वर्षे गटामध्ये राज्यस्तरीय खेळाडू उत्कर्ष परदेशी याने सुंदर खेळ करत आपले सर्व सामने सहज जिंकले तर अंतिम सामन्यात रुद्र पाटील यचंहो सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद मिळविले या गटात गणेश दवंगेने तिसरा आणि प्रणव रामजाली याने चवथा क्रमांक मिळविला. १४ वर्षे मुलींच्या गटात भूमिका वाघमारे हीने अंतींम सामन्यात सुरवातीपासूनच सुंदर खेळ करत मनाक्षी कुलकर्णीचा १३-०३, १७-०९ असा पराभव करून विजेतेपद मिळविले. या गटात तेजल खंडारेने तिसरा आणि ईश्वरी हीने चवथा क्रमांक मिळविला. वरिष्ठ महिलांच्या गटात राष्ट्रीय खेळाडू धोत्रे हीने अंतिम लढतीत राज्य स्तरीय खेळाडू वेदांती पवार हिला पराभूत करून विजेतेपद मिळविले . या गटात ज्योती निकम यांनी तिसरा क्रमांक मिळविला. वरिष्ठ पुरुषांच्या गटामध्ये राष्ट्रीय खेळाडू भूषण भटा टे याने आपल्या दर्जाला साजेसा खेळ करत एकतर्फी विजयी पताका झळकावली.

. त्याने अंतिम लढतीत नकुल चावरे याच्यावर २५-०९, २५-०७ अशी मात करत विजेतेपद आपल्या नांवे केले. या गटात यश अहिरे याने तिसरा तर योगेश डुकरे याने तिसरा क्रमांक मिळविला . जेष्ठ पुरूषांच्या त=गटात अशोक कचरे यांनी विजेतेपद मिळविले तर उमेश सेनभक्तने उपविजेटपॅड मिळविले. अभिषेकी मोहिते याने तिसरा तर राजेंद्र प्रधान यांनी चवथा क्रमांक मिळविला.जेष्ठ महिला गटात संगीत मोरे यांनी विजेतेपद तर प्रणाली अहिरे यांनी उपविजेपद मिळविले या गटात अनिता मोरे यांनी तिसरातर नेहा पुराणिक यांनी चवथा क्रमांक मिळविला.
या स्पर्धेच्या पारितोषिक समारंभाचे प्रमुख अतिथी माजी मुख्य कार्यकारी अभियंता जी. डी. पोखरकर यांच्या हस्ते आणि अशोक दुधारे, आनंद खरे, अशोक कचरे,दीपक निकम यांच्या हस्ते सर्व गटातील पहिले चार क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना आकर्षक मेडल्स आणि प्राविण्य प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अभियंता जी. डी. पोखरकर यांनी सांगितले की, खेळाडूंना स्पर्धेचे उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे काम सहकार महर्षी स्व. उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फौंडेशनच्या वतीने करून दिले जाते ही फार आहे. यामुळे खेळाडूंना आपल्या खेळामध्ये मिळते. मी देखील माझ्या परीने अश्या क्रीडा उपक्रमाना सर्व प्रकारचे सहकार्य करेन असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक निकम यांनी केले आणि दर महिन्याला अश्या सर्व गटांच्या स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना घडवण्याचे आमचे प्रयत्न सुरु राहतील अशी आमचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले.
अंतिम निकाल :
१४ वर्षे मुले :-
१) राम जयस्वाल – प्रथम २) संकेत चव्हाण – द्वितीय, ३) कार्तिक गोडबोले – तृतीय, आदेश वसावे – चतुर्थ..
१४ वर्षे मुली :-
१) भूमिका वाघमारे – प्रथम, मनाक्षी कुलकर्णी – द्वितीय, ३) तेजल खंडारे – तृतीय, – ईश्वरी पुराणिक -चतुर्थ.
१९ वर्षे मुले :-
१) उत्कर्ष परदेशी – प्रथम, रुद्र पाटील – द्वितीय, गणेश दवंगे – तृतीय, प्रणव रंमजाली – चतुर्थ.
१९ वर्षे मुली :-
१) दिशाली बलदवा- प्रथम, मेघा बिडे – द्वितीय, गौरी तेलंगड – तृतीय, कृतिका काकवीपुरे – चतुर्थ.
वरिष्ठ गट पुरुष :-
१) भूषण भटाटे – प्रथम, नकुल चावरे – द्वितीय, यश अहिरे – तृतीय, योगेश डुकरे – चतुर्थ.
वरिष्ठ गट महिला :-
१) मोनाली धोत्रे – प्रथम, वेदांती पवार – द्वितीय, ज्योती निकम – तृतीय.
जेष्ठ नागरिक पुरुष :-
१) अशोक कचरे – प्रथम, उमेश सेनभक्त – द्वितीय, अभिषेक मोहिते – तृतीय, राजेंद्र प्रधान – चतुर्थ.
जेष्ठ नागरिक महिला :-
१) संगीता मोरे – प्रथम, प्रणाली अहिरे – द्वितीय, अनिता मोरे – तृतीय, नेहा पुराणिक – चतुर्थ.
