
नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल माध्य.विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आज निरोप देण्यात आला.
शालेय जीवनातील हा शेवटचा दिवस असल्याने सर्व विद्यार्थी या प्रसंगी भावूक झालेले दिसून आले.आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शाळेविषयी व शिक्षकांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.राजनंदिनी कुकडे,अक्षदा चव्हाण,अथर्व महाजन,सागर गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिक्षक मनोगतात दहावीचे वर्गशिक्षिक विजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच परीक्षा कालावधीत आरोग्याकडे लक्ष द्यावे असे सांगितले. विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिद्द, चिकाटी व कष्ट करून यशाचे शिखर गाठावे असे आवाहन केले .
संस्थेचे चेअरमन सुनीलकुमारजी कासलीवाल
यांनी देखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आईवडिलांचे व शाळेचे नाव मोठे करावे असे आवर्जून सांगितले व जीवनात यशस्वी होण्याबरोबरच चारित्र्य संवर्धनाकडे लक्ष द्यावे असा संदेश दिला.
या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल,मुख्याध्यापक गोरख डफाळ, विशाल सावंत
प्रिन्सिपल मनी चावला, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सर्वांनी
विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी पुढील व वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या महाजन व शुभम महाजन यांनी तर विद्यालयातील शिक्षक शरद पवार यांनी आभार व्यक्त केले.
