
मुंबई (प्रतिनिधी)वाकोवाक्यम जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा विविध शाळांच्या उत्स्फूर्त सहभागासह यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत NMMC 71, NMMC 78, NMMC 74, नवी मुंबई विद्यालय (मराठी व इंग्रजी माध्यम), गोशाळा मार्ग शाळा, ICL मोनामी हायस्कूल, पराग विद्यालय भांडुप, एस. के. पंत वालावलकर शाळा कुर्ला, स्वामी विवेकानंद शाळा कुर्ला व RZP शाळा वाघेघर यांसह एकूण १३ शाळांनी सहभाग घेतला.
प्राथमिक फेरीनंतर ८ शाळांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीत नवी मुंबई विद्यालय (मराठी माध्यम) यांनी प्रथम, नवी मुंबई विद्यालय (इंग्रजी माध्यम) यांनी द्वितीय तर RZP शाळा, वाघेघर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
या कार्यक्रमाला विक्रांत सोलंकी सर (Chief Experience Leader) व सार्थक सर (Senior AL) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनचे हर्षद सर यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले
