
मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना मुख्याध्यापिका ज्योती काळे, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व शिक्षक वृंद.
नांदगाव —- मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
उपशिक्षिका शितल तासकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,कर्मवीर आण्णासाहेब मुरकुटे यांचे कार्य प्रामुख्याने मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या शिक्षण संस्थेशी जोडलेले आहे.
महात्मा फुले आणि राजर्षी शाहू छत्रपती यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी समाजातील बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्त्वानुसार ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली.

मुख्याध्यापिका ज्योती काळे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या की, कर्मवीर आण्णासाहेब मुरकुटे हे शिक्षणप्रसाराच्या कार्यात आयुष्य वेचणारे, निर्भीड, तत्वनिष्ठ, अभ्यासू कायदे पंडित आणि मराठा विद्या प्रसारक समाजाच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान देणारे एक थोर समाजसुधारक व शिक्षणमहर्षी होते.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले.
