
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१७८ वा दिवस
हिंदुस्तानतील या प्राचीन वंशात सुरुवातीला एक शोधकपणा होता. पुढे त्याचे रूपांतर निर्भीड विश्लेषणात झाले. या चिंतनाचे प्रारंभीचे स्वरूप नवख्या शिल्पकाराने थरथरत्या हातांनी आकार द्यावा असे असले, तरी लवकरच त्याचे रूपांतर परिपूर्ण शास्त्रात, जोरकस प्रयत्नात आणि विस्मयकारक निष्कर्षात झाले. या वंशाच्या विचारात जी निर्भयता आहे त्यापोटी त्या वंशाने यज्ञवेदीची प्रत्येक वीट कशी रचावी याचा विचार केला; पवित्र ग्रंथांमधला प्रत्येक शब्द घासून पुसून घेतला; त्याची सूक्ष्म चिकित्सा केली; प्रत्येक संस्काराची, विधीची रचना आणि पुनर्रचना केली; त्यावर आक्षेप घेतले, ते फेटाळले किंवा त्यांचे स्पष्टीकरण केले. या निर्भयतेमुळेच त्यांनी आपली दैवते उलटीसुलटी करून तपासली. सर्वशक्तिमान, सर्वज्ञानी, सर्वसाक्षी असा जो विश्वाचा निर्माता, सनातन आकाशस्थ पिता तो मुळी आवश्यकच आहे असे त्यांनी घोषित केले आणि अशा एका विश्वधर्माची स्थापना केली.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास २२ शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ११ फेब्रुवारी २०२६
★ श्रीरामदास नवमी, सज्जनगड यात्रा
★ संत मुक्ताई यात्रा मुक्ताईनगर
★ १८४७ लाईटच्या बल्बचा शोध लावणारे अमेरिकन संशोधक व उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्मदिन
★ १९४२ प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा स्मृतीदिन.
★ १९६८ जनसंघाचे एक संस्थापक, तत्वज्ञ पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृतीदिन
★ १९७७ भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांचा स्मृतीदिन.
★ १९९० – २७ वर्षाच्या तुरुंगवासानंतर दक्षिण आफ्रिकेचे कृष्णवर्णीय गांधीवादी नेते नेल्सन मंडेला यांची सुटका.
