
मनमाड (प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूल च्या विदयार्थ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ,मनमाड येथे भेट दिली. तेथील अनेक प्रकारचे कांदा मालाचे प्रकार नवीन लाल कांद्याची आवक-घसरण, व मनमाड शहराच्या आसपास असलेल्या शेतकऱ्यांनी आपला शेतातील कांदे विकण्यासाठी ट्रक्टर, पिकअप ई. विविध साधनांद्वारे मार्केट मध्ये आणुन तो व्यापारी, मापारी, अडत्या ,मालाची मोजणी विक्री काटा, मालाची किंमत, मालाची बोली, पावती, कांदा चे लिलावहे सर्व अगदी जवळुन बघितले तसेच मार्केट मध्ये आलेल्या शेतकऱ्यांसोबत, तेथील व्यापारी सोबत बाजारपेठ, बाजारभाव ,आवक ,आयात – निर्यात,बंदी/सुट गोडाऊन ,बाजारपेठेत कांदा मागणी, याबाबत चर्चा केली.

कडधान्य मार्केटला देखील भेट देऊन तेथील दैनंदिन कामे यांची माहिती घेतली. तेथील जवळील के.एम.कृषी खाजगी मार्केट येथील मका – कांदा मालाची बाजारपेठ बघितले. मार्केट चे मालक ललवानी साहेबांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देत तेथील कांदा-मका मालाची माहिती दिली.विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर तेथील कामगार- मजुर यांच्याशी हितगुज साधले. तेथील कांदा-मका मालाची मोजणी करणारे अनेक मशिनरी, यंञे ,मोठीच मोठी गोडाऊन बघितले.शेतमालाचे दर हे दररोज बदलतात त्यामुळे विक्री पुर्वी व विक्री नंतर बाजार पेठेत काही बदलाव होतात का? मक्का चे उत्पादन , मक्का ची मागणी,पैशांचे आँनलाईन/आँनलाईन व्यवहार ,कुठले पिकांची बाजार भाव वाढले-घसरले,वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांजवळील बाजार पेठेत येणारा माल कसा असतो? अशी अनेक प्रकारे माहिती घेतली. विद्यार्थ्यांना एक नवीन अनुभव या बाजार समिती भेटीमध्ये आला. शाळेच्या मुख्याध्यापिका शितल आहेर, सोबत शिक्षिका संपदा येणारे, अल्का गायकवाड, आम्रपाली मोरे उपस्थित होते.
