
नांदगाव (प्रतिनिधी): येथील व्ही. जे. हायस्कूलमध्ये ‘जायंट्स ग्रुप ऑफ नांदगाव सहेली’ यांच्या वतीने राष्ट्रीय जंतनाशक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी, संतुलित आहार यावर मार्गदर्शन करून जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट्स ग्रुप ऑफ नांदगाव सहेलीच्या अध्यक्षा सौ. संगीता बागोरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शासकीय रुग्णालयातील डॉ. कुमारी अश्विनी महाजन उपस्थित होत्या. तसेच आरोग्य विभागाचे श्रीमती नयना गजभिये, श्री. गोपाल बिडगर आणि शाळेचे उपमुख्याध्यापक डॉ. श्री. नांदुरकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व
कार्यक्रमात डॉ. अश्विनी महाजन यांनी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळीचे महत्त्व पटवून दिले. “निरोगी आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छता आणि सकस आहार अत्यंत आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले. उपमुख्याध्यापक डॉ. नांदुरकर सर यांनीही विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत दक्ष राहण्याचे आवाहन केले.
उपस्थित सदस्य
याप्रसंगी जायंट्स सहेली ग्रुपच्या सदस्या:
- सौ. शकुंतला शिंदे
- सौ. छायाताई परदेशी
- सौ. साधनाताई खरोटे
- सौ. भारतीताई खरोटे
- सौ. जयश्री पटेल
यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.यावेळी जायन्टस ग्रुप चे डायरेक्टर श्री. सुमित गुप्ता हे ही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या सचिव सौ. निवेदिता प्रसाद बुरकुल यांनी केले.
आभार प्रदर्शन सौ. सुनीता देवरे मॅडम यांनी केले.शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
