
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१७७ वा दिवस
या पृथ्वीवरील आत्मे आपल्या कर्मक्षालनार्थ येथे जन्माला येतात, प्रत्येक जीवास शिवत्वाकडे वाटचाल करण्यासाठी व अंती शिवत्वाप्रत पोहोचण्यासाठी याच भूमीत यावे लागेल. औदार्य, शुचिता, शांती यांचे उत्तुंग आदर्श येथे निर्माण झाले आहेत. अंतर्दर्शी वृत्ती आणि अध्यात्म यांची भारत ही धन्यभूमी आहे. हिंदुस्थानच्या धार्मिक वाङ्मयातील, त्याच्या काव्यसमुद्रातील, त्याच्या दर्शनांमधील व त्याच्या विविध शास्त्रीय ग्रंथरचनांतील ओळीओळींतून आपल्याला जे दर्शन होते ते एक विराट मानवसमूह संस्कृतीची पहाट होण्याच्याही पूर्वी जी प्रगती करत होता त्याचे. भूक आणि तहान, लालसा आणि तृष्णा यांच्या प्रभावाखाली वावरणारा; सौंदर्याकडे आकर्षित होणारा, श्रेष्ठ आणि अगम्य मानवशक्तीचे देणे लाभलेला, विविध उत्कट भावनांनी ज्याच्या कृती प्रेरित झालेल्या असा हा भारतीय मानवसमाज आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास २१ शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०२६
★ १८०३ शिक्षणतज्ञ, उद्योगपती, मुंबईच्या विकासात मोठा वाटा असलेले, दानशूर जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ मुरकुटे यांचा जन्मदिन.
★ १९१० सुप्रसिध्द मराठी साहित्यीक दुर्गा भागवत यांचा जन्मदिन.
★ १९१२ निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बऱ्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांच स्मृतीदिन
★ १९२९ जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
★ १९८२ मराठी लेखक, टीकाकार, विद्वान नरहर कुरुंदकर यांचा स्मृतीदिन.
★ HSC परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. आत्मविश्वासाने आणि निर्भिडपणे परीक्षेला सामोरे जा. मनापासून केलेल्या अभ्यासाचे फळ चांगलेच मिळेल. 🌸🌸
