
ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे इयत्ता १० वी च्या विद्यार्थी आशीर्वाद व गुणगौरव सोहळा
प्रसंगी संस्थेचे
संस्थापक सरचिटणीस माननीय श्री कृष्णारावजी नेरे सर (दादासाहेब) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलठाणचे प्रतिष्ठित व्यापारी गोकुळ शेठ कोठारी (नवनियुक्त संचालक कृषी उ.बाजार समिती नांदगाव )सुभाष शेठ बुरड ,वाकल्या चे प्रतिष्ठित व्यापारी मनोज शेठ सोनी ,नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक
दिगंबर भदाणे साहेब तसेच बोलठाण दूरक्षेत्राचे बस्ते दादा, बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक श्री शशिकांत बरवडे साहेब, श्री .केशवजी तुपे सर व्ही. जे.हायस्कूलचे प्राचार्य श्री ठाकरे सर ढेकू चे उपसरपंच राजेंद्र चव्हाण पोलीस पाटील विजय चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी मा भदाने साहेब यांनी योग्य नागरिक बना,आई व वडिलांचे स्वप्न पूर्ण करून तुमच्या नावाने ओळख निर्माण करा असे आव्हान केले . तर मनोजशेठ सोनी यांनी जीवनात योग्य आदर्श व्यक्ती ची निवड करून धेय बाळगा . तर कुठल्याही प्रकारची गरज पडली तर हक्काने आम्हा सोनी परिवाराकडे या नेहमी आपणासोबत आहोत असे भावनिक आव्हान केले .मा श्री बरबडे साहेब (शाखा व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया बोलठाण) यांनी मला माझे बालपण आठवले व तुम्ही आमच्या सर्वापेक्षा मोठ्या पदावर विराजमान होऊन आई-वडिलांची सेवा करावी अशी इच्छा व्यक्त केली .
अध्यक्षीय भाषणात मा .नेरे सर यांनी तुम्हाला काय व्ह्यायचे ते उद्या नव्हे तर आजच निश्चित करा व मार्ग धरा कारण उद्याला अंत नसतो . संस्थेचे शाळेचे व आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करा असे मनोगतातून व्यक्त केले .

कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजनाने झाली नंतर प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक श्री थोरात सर यांनी शाळा व संस्था याची पार्श्वभूमी ,आजपर्यंतची प्रगती किती वी कशी झाली याची सारासार माहिती दिली. तर पाहुण्यांचा परिचय श्री नितानकर नितीन एकनाथ यांनी करून दिला. त्यानंतर सरचिटणीस महोदय यांचा सत्कार श्री थोरात सर यांनी केला तसेच सर्व मान्यवरांचा सत्कार सरचिटणीस नेरे सर यांच्या हस्ते करण्यात आला. गुणगौरव सोहळा प्रसंगी सर्वप्रथम आदर्श विद्यार्थी प्रथमेश सुनील राठोड १०वी, कु. तेजस्विनी शिवाजी राठोड ९वी, शिवम सुनील चव्हाण ८वी. यांचा सत्कार केला तसेच इतर मागास बहुजन कल्याण मार्फत घेण्यात आलेल्या इस्रो भेटी साठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत नाशिक जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थी रितेश ज्ञानेश्वर पवार ९वी यास आशीर्वाद देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशाल जाधव, आनंदा राठोड, सपना पवार, कोमल चव्हाण रांगोळी स्पर्धा, सुनील राठोड, प्रगती राठोड लांब उडी, शरद जाधव, रोहित पवार तीन पाई शर्यत , रोहित चव्हाण स्लो सायकल यांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन श्री देवरे बी.के व पवार सर यांनी केले तर आभार श्री कामडी एस.एम.यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर, श्री चव्हाण सर ,श्री धाकतोडे सर, श्रीमती. ताकाटे मॅडम श्रीमती. भामरे मॅडम श्रीमती. गायकवाड मॅडम, श्री जानराव सर श्री. माने भाऊसाहेब श्री धामणे, श्री कवडे, श्री.अहिरे, श्री. ढाकणे, श्री. गावीत, श्री. सुरंजे, श्री .पवार ,श्री अहिरे बाळू , श्री जैन, या सर्वांनी महत्त्वाचे योगदान दिले.
