
नाशिक ( प्रतिनिधी )दि.न्यू. एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नाशिक येथे इयत्ता १०वी साठी ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयावर समुपदेशक सौ.अमृता कविश्वर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

डी.डी.बिटको बॉईज हायस्कूल मधील जेष्ठ शिक्षिका सौ.अमृता कवीश्वर यांनी विद्यार्थिनींना परीक्षेला सामोरे जाताना येणारा ताण हा आवश्यकच असून त्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे व ते व्यवस्थापन कसे करावे त्यासाठी त्यांनी विविध क्लुप्त्या विद्यार्थिनींना सांगितल्या. अध्ययन,मनन, चिंतन म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगितले.तसेच वर्षभर केलेला अभ्यास वेळेवर आठवावा, यासाठी पेपर पूर्वी एकाग्रता कशी साधावी ? मन शांत कसे करावे ? यासाठी श्वासावर नियंत्रण ठेवण्याच्या पद्धती शिकवल्या. आनापानाचा सराव देखील करून घेतला आणि विद्यार्थिनींना असलेल्या शंकांचेही त्यांनी निरसन केले.
यावेळी बोलताना मुख्याध्यापिका सौ. सुनिता बाजपेयी यांनी ताणतणावाचे व्यवस्थापन केल्यास विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढेल असे मौलिक मार्गदर्शन सौ.कविश्वर यांच्या व्याख्यानातून मिळाले असून ही विद्यार्थिनीसाठी यशाची गुरुकिल्ली आहे असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. राजेंद्र सोमवंशी ,पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे, ग. कौ. सदस्य सौ.भारती चंद्रात्रे ,श्री.बागुल सर,ज्येष्ठ शिक्षिका सौ.विद्या भानोसे, श्री.महेंद्र जगताप,सौ. मेघना देशपांडे व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
