
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१७५ वा दिवस
जागृतीच्या या प्रारंभीच्या अवस्थेत आधुनिक हिंदुस्थानातील स्वतंत्र आणि मुक्त विचारधारा काही प्रमाणात प्रकट होऊ लागली आहे. एका बाजूला विज्ञान सहस्र सूर्याच्या आभेने तळपत आहे. भौतिक शक्ती, घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म वेध घेत आहे. दुसऱ्या बाजूला हिंदुस्थानची प्राचीन आणि संजीवक परंपरा, वैभवाच्या शिखरावर तळपत असताना हिंदुस्थानच्या श्रेष्ठ विचारवंतांनी व्यक्त केलेली विचारसंपदा; अनंत वर्षांपासून हिंदुस्थानच्या नसानसांतून वाहत असलेली वैश्विक प्रेमाची स्फूर्तिधारा, या सर्व परंपरेतील असामान्य पुरुषार्थ, अलौकिक बुद्धिमत्ता आणि असीम आध्यात्मिकता ही देवदेवतांनी हेवा करावा अशी आहे. एकीकडे हा गौरवशाली इतिहास तरुण मनाला भविष्याच्या आशेने भारून टाकत असतो; तर दुसरीकडे पाश्चात्य विज्ञानाचा झगमगाट त्याचे डोळे दिपवीत असतो.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास १९ शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६
★ संतश्रेष्ठ गजानन महाराज प्रकट दिन
★ १८९७ भारताचे तिसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ, भारतरत्न डॉ. झाकीर हुसेन यांची जन्मदिन.
★ १८९९ रँडचा खून करण्याऱ्या चाफेकर बंधूची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
★ १९७१ मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’ चे संस्थापक डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
