
( नायडोंगरी )महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय नाशिक यांच्या मार्फत 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरु होणाऱ्या परीक्षेची न्यायडोंगरी केंद्राची आसनव्यवस्था जाहीर करण्यात आली आहे
एस झिरो 25568 ते एस झिरो 25618 विज्ञान शाखेच्या व एस 107040 ते एस 1072 60 पर्यंतच्या कला शाखेच्या अशा सर्व 372 विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था लोकनेते कै अँड विजय शिवराम आहेर हायस्कूल व जुनियर कॉलेज नायडोंगरी या विद्यालयात करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात मोबाईल इलेक्ट्रॉनिक घड्याळ इत्यादी साहित्य आणू नये.असे आवाहन प्राचार्या व एच एस सी परीक्षेच्या केंद्रसंचालिका सौ पी व्ही आहेर यांनी केले आहे. या केंद्रावर उपमुख्याध्यापक पी एन सोनेज हे उपकेंद्रसंचालक म्हणून काम बघत आहेत
