
नांदगाव:दिनांक- 4 फेब्रुवारी 2026
श्री. एम.जे.कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट संचलित सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयात 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धांचे उदघाटन मुख्याध्यापक गोरख डफाळ ,विशाल सावंत,प्रिन्सिपल मनी चावला यांच्या हस्ते करण्यात आले.

विविध खेळांची मेजवानी :
या महोत्सवात वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी मिळाला. यात प्रामुख्याने खालील खेळांचा समावेश होता:
मैदानी स्पर्धा: १०० व २०० मीटर धावणे, रिले शर्यत ,कबड्डी, खो-खो आणि शुटिंग बॉल,

यांसारख्या खेळांमध्येही विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला.
शाळेच्या चारही हाऊसमध्ये (ब्ल्यू, यलो,रेड आणि ग्रीन ) विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळाली. विशेषतः मुलींच्या क्रिकेट सामन्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
या क्रीडा सामन्यांचे पंच म्हणून विद्यालयातील शिक्षक केतन दळवे, अनिकेत राऊत,मनोज साळुंखे,मनोज व्हरगीर यांनी काम पाहिले .तर गुणलेखक म्हणून रवींद्र चव्हाण,हर्षदा भालेराव,रुपाली,मालकर, योगिता गायकवाड, ,पल्लवी काकळीज यांनी काम पाहिले.क्रीडा स्पर्धांचे धावते समालोचन विद्यालयातील शिक्षक शरद पवार ,संदीप आहेर, विजय गायकवाड यांनी केले.

स्पर्धा समाप्तीनंतर आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक गोरख डफाळ यांनी
“खेळामुळे केवळ शरीर सुदृढ राहत नाही, तर आयुष्यात जिद्द आणि संयमही निर्माण होतो, म्हणून शिक्षणाबरोबरच खेळाकडेही लक्ष दिले पाहिजे”. असे प्रतिपादन केले.
संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा,सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल, यांनी क्रीडा स्पर्धेतील विजेत्या संघांचे तसेच सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

.सदर क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन यांच्यासह विद्यालयातील शिक्षक संजय शिवदे,राहूल आहेर , संदीप आहेर, रवींद्र चव्हाण, शरद पवार,मनोज साळुंखे,रिजवान मन्सुरी, हर्षदा भालेराव , रुपाली मालकर ,योगीता गायकवाड , सोनाली बोडखे, यांनी विशेष मेहनत घेतली.
