
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१७३ वा दिवस
कशी ही विलक्षण भूमी! येथे कुणीही येऊन उभा राहो, मग तो परका असेल किंवा या भूमीचा पुत्र असेल, त्याचे हृदय जर पशुचे नसेल तर त्याला जाणवेल की पृथ्वीच्या शुद्धतम, श्रेष्ठतम, इतिहासालाही शतकानुशतके ज्या काळाच्या खुणा टिपता आल्या नाहीत अशा काळापासून माणसाला पशुतत्त्वाकडून देवतत्त्वाकडे नेण्याची साधना जे करीत आहेत अशा संतांच्या आत्मशक्तीचे स्पंद येथे स्फुरताहेत. तत्त्वज्ञान, नीती आणि अध्यात्म या शास्त्रांची ही पुण्यभूमी आहे. पशुतत्त्वाकडून देवतत्त्वाकडे चाललेल्या संघर्षमय प्रवासात पार्थिवाचे ओझे झुगारून देत जन्म आणि मृत्यूच्या पलीकडच्या चिदानंदस्वरूप अशा आत्मधामाच्या मार्गावरची ही विसावण्याची स्थळे आहेत.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास १७ शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी २०२६
★ औदुंबर पंचमी नृसिंहवाडी यात्रा
★ १९३२ दादासाहेब फाळके निर्मित भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला मराठी बोलपट (चित्रपट) अयोध्येचा राजा मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित.
★ १९३१ स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक, कायदेपंडित, पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे वडील, मोतीलाल गंगाधर नेहरु यांचा स्मृतीदिन
★ १९३९ बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतीदिन.
