
सिन्नर (प्रतिनिधी)४ फेब्रुवारी २०२६ नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५६ व्या बलिदान दिनानिमीत्त तानाजी चौक मित्र मंडळ सिन्नर यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात नरवीर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रमोद लचके यांनी केले.व प्रास्ताविक संतोष पांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र होते आणि स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीपासूनच महाराजांसोबत होते.महाराजांचे विश्वास होते त्यांनी अनेक महत्वाच्या लढ्या नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी लढल्या शेवटची लढाई कोंढाणा किल्ल्यावर स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा महान नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की छत्रपती शिवराय यांच्यासाठी आठरापगड जातींतील लोकानी स्वतःला स्वराज्यासाठी वाहून दिले त्यातीलच एक नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर अनेक लढायांची जबाबदारी शिवरायांनी दिली त्यातीलच महत्त्वाची व शेवटची लढाई कोंडाणा किल्ल्याची जबाबदारी त्यांच्यावर दिलीकोंढाणा मोहीम सिंहगडची लढाई शिवाजी महाराजांनी कोंढाणा सर करण्याची जबाबदारी तानाजींवर सोपवली होती. तानाजींनी आपल्या सैन्यासह कड्यावरून चढून कोंढाणा किल्ल्यावर छापा टाकला. त्यांचा सामना वीरमरण उदयभान राठोड या मुघल किल्लेदाराशी लढताना तानाजींनी असीम शौर्य दाखवले, पण ते गंभीर जखमी होऊन धारातीर्थी पडले.सिंहगड नामांतर तानाजींच्या बलिदानानंतर त्यांच्या सन्मानार्थ कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून ‘सिंहगड’ करण्यात आले. तानाजी मालुसरे हे स्वराज्यासाठी आपल्या मुलाचे म्हणजे रायबा लगीन आधी कोंढाण्याचे मंग रायबाचे असे म्हणणारे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी तिच्यासाठी आपल्या प्राणांची बलिदान दिले अशा महान योद्धास विनम्र अभिवादन
याप्रसंगी डुबेरे येथील शाहीर समीर सय्यद मास्टर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील पोवाडा सादर करून उपस्थितांचे मने जिंकून घेतली
तर आभार संजय रायजादे यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, संतोष पांडे, प्रमोद लचके, सागर देशमुख, संजय रायजादे, समीर सय्यद, मल्लिक हकीम सय्यद ,पंकज भाऊ शिंदे , कैलास भाटजीरे , गणेश भुसा, अरुण देशमुख ,संजय शिंदे, संजय रायजादे, शाहू शिंदे , रुद्राक्ष तर्फे , रतन तांबे ,अमित पांडे, ओम देशमुख ,जय रत्नाकर ,गणपत रसाळ, विजय मुठे ,नाना जाधव आदेश मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली याप्रसंगी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे अमर रहे छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय आधी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला
