
लासलगाव (प्रतिनिधी ) नू. वि. प्र. मंडळ संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवार, दि. ०२ फेब्रुवारी, २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखन कौशल्य कार्यशाळा’ संपन्न झाली. मेजर विक्रांत कावळे व श्री.योगेश चकोर यांनी विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. मेजर विक्रांत कावळे यांनी भारतीय सैन्य दल व भारताचे शेजारील राष्ट्रसंबंध या विषयावर मार्गदर्शन केले. तर श्री.योगेश चकोर यांनी भारतीय सैन्याने लढलेल्या महत्वाच्या लढाया या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.मिलिंद साळुंके यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय व कार्यशाळेमागील भूमिका महाविद्यालयाचे नियतकालिक ‘नक्षत्र’ चे संपादक डॉ. प्रणव खोचे यांनी विशद केली. या कार्यशाळेसाठी नू.वि.प्र.मंडळाचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.महेश होळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.बापू शेळके यांनी केले. या प्रसंगी उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे, डॉ.संजय निकम, प्रा.किशोर गोसावी आदि उपस्थित होते. एकूण २५० विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला.
