
ओझर : (प्रतिनिधी) दात्याने ता. निफाड, जि. नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालयात मिशन ॲनिमिया मुक्त भारत अंतर्गत अरुणोदय सिकलसेल अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत हायस्कूल मधील मुले मुलीची सिकलसेल तपासणी करून तसेच हिमोग्लोबिन तपासणी शिबिर व आरोग्य शिक्षण देण्यात आले. या शिबिराचे आयोजन हायस्कूलचे मुख्याधापिका श्रीमती प्रियंका खुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वैशाली कुयटे, आरोटे सुवर्णा, गवळी महेंद्र, कदम रुपाली, गायकवाड वैशाली, शिंदे वैशाली, गुरगुडे अक्षदा, हांडोरे विद्या, काळे प्रतिभा, वाघमारे आनंदा परिचर, यांच्या सहकार्याने करण्यात आले. यावेळी एकूण 115 विद्यार्थ्यांची सिकलसेल व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. तपासणी बरोबरच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यांना सिकलसेल आजार व ॲनिमिया आजाराविषयी सविस्तर व योग्य आरोग्य शिक्षण देण्यात आले.
सिकलसेल आजार हा आनुवंशिक रक्तविकार असून यामध्ये लाल रक्तपेशींचा आकार बदलून त्या विळयाच्या आकाराच्या होतात. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन अशक्तपणा, वेदना, वारंवार आजारपण, संसर्गाचा धोका तसेच ॲनिमिया निर्माण होतो. वेळेवर तपासणी, योग्य समुपदेशन व आरोग्यविषयक मार्गदर्शन केल्यास या आजाराचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य होते.हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर अंतर्गत उपकेंद्र दीक्षि मधील दात्याने यांच्या वतीने यशस्वीरीत्या पार पडले. या वेळी डॉ.आनंद सुर्वे वैद्यकीय अधिकारी, प्राची पवार मंजिरी सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रतिभा जुनागडे आरोग्य सहाय्यक श्री राठी नाना, श्री देवरे नाना, प्रयोगशाळा अधिकारी श्रीमती पल्लवी कुलकर्णी, आरोग्य सहायिका छाया जाधव,आरोग्य सेवक अविनाश घोडविदेआरोग्य सेवक विजय गायकवाड,श्रीमती वंदना केरुळकर, श्रीमती सुनंदा चौधरी, आशा ताई अनिता मोटमल, पूनम गांगुर्डे, शैला ससाणे, सुनीता टोंगारे, रत्ना खरे, शारदा काटे, शुभांगी घरे, एचएलएलचे फेबॉस्टिक प्रशिक्षक बागुल यांच्या सहकार्याने सिकल सेल तपासणी पार पाडली युवक-युवतींमध्ये सिकलसेल व ॲनिमिया आजाराबाबत जागृती निर्माण करणे, लवकर निदान करणे आणि निरोगी पिढी घडविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
