
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१७० वा दिवस
कोणत्याही व्यक्तीला वा राष्ट्राला थोर होण्यासाठी पुढील तीन गोष्टींची नितांत आवश्यकता आहे.
१) चांगुलपणाच्या शक्तीवर प्रगाढ विश्वास,
२) मत्सराचा आणि संशयखोरपणाचा अभाव,
३) जे चांगले बनण्याचा व चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या सर्वांना साहाय्य करणे. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर त्यांना विरोध न करता ती तुमच्या मार्गाची साफसफाई आहे असे समजुन सतत पुढे चला हमखास यशस्वी व्हाल.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास १४ शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ३ फेब्रुवारी २०२६
★ १८२१ वैद्यकशास्त्रील जगातील पहिली महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा जन्मदिन
★ १८३२ पहिले क्रांतिकारक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. स्मृतीदिन
★ १९६३ रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर श्री. रघुराम राजन यांचा जन्मदिवस.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
