
कासारी.(प्रतिनिधी ) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी शब्दभांडार वाढवावा यासाठी जिल्हा परिषद नाशिक आयोजित ‘स्पेलिंग बी स्पर्धा’हे एक प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन,कासारी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्रजी काटकर यांनी केंद्रशाळा कासारी येथे आयोजित स्पेलिंग बी स्पर्धेत केले. माननीय मुख्यकार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल मॅडम यांचे संकल्पनेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढवावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या स्पेलिंग बी स्पर्धेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे राज्यात कौतुक होत असल्याचे केंद्रप्रमुख राजेंद्रजी काटकर यांनी उपस्थित स्पर्धकांना व शिक्षकांना सांगितले. याप्रसंगी घेण्यात आलेल्या स्पेलिंग बी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला गट क्रमांक १ इयत्ता पहिली व दुसरी -प्रथम देवांश कांदे शाळा जळगाव बुद्रुक,द्वितीय- प्रांजली मोरे शाळा कासारी गट क्रमांक २ इयत्ता तिसरी व चौथी- प्रथम कावेरी राठोड शाळा कसाबखेडा, द्वितीय तनुजा सरोदे शाळा जळगाव खुर्द,तृतीय अनुष्का हटकर शाळा हटकरवस्ती गट क्रमांक ३ पाचवी व सहावी- प्रथम सोहम सरोदे शाळा जळगाव खुर्द,द्वितीय खुशी इप्पर शाळा कासारी गट क्रमांक ४ सातवी व आठवी – प्रथम मानवी सरोदे शाळा जळगाव खुर्द केंद्रस्तर प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांची बीटस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.स्पर्धा यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख राजेंद्रजी काटकर, केंद्रमुख्याध्यापक भाऊसाहेब मवाळ,प्रकाश मोरे,रविकिरण तरोडे,गोकुळ निकम,पंकज जाधव,अमोल बच्छाव,नवनाथ गीते,सागर गजभिव,कल्पना चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व विजयी स्पर्धकांना केंद्रप्रमुख राजेंद्रजी काटकर यांच्यावतीने बक्षीस देण्यात आले तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
