
कै.हरबा डी.एस
हरबा सर यांची अपघाती निधनवार्ता खूपच दुःखद आणि वेदनादायी आहे. हरबा सर हे मूळचे वेहेळगाव येथील रहिवासी. एका मोठ्या आणि अतिशय गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थीतीत शिक्षण पूर्ण केले. अतिशय बालपणापासून हरबा सर, त्यांचे बंधू, भगिनी यांचे आमच्या कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहे. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर उपशिक्षक म्हणून व्हि.एन.नाईक शिक्षण प्रसारक संस्थेत नोकरी स्वीकारली. बराच काळ मुख्याध्यापक म्हणून कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली.**एक आदर्श शिक्षक, एक आदर्श मुख्याध्यापक, एक आदर्श प्रशासक म्हणून त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी व स्मरणीय असेल. आजही संस्थेमध्ये जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा ते आपले योगदान देत राहिले. शासन निर्णयांचा त्यांचा असलेला सखोल अभ्यास उल्लेखनीय असा होता.**हरबा सर यांच्या जाण्याने शैक्षणिक, सामाजिक स्तरावर भरून न निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. गावाप्रती असलेले प्रेम, सर्वांशी असलेले जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध सदैव जपत राहिले.**व्ही.एन.नाईक शिक्षण प्रसारक संस्था, शिक्षक भारती संघटना महाराष्ट्र राज्य यांचे वतीने स्वर्गीय हरबा सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची शक्ती देवी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.*जयवंत भाबड*
