
नाशिक ( प्रतिनिधी) : बहुजन साहित्य संघ,चिखली जि.बुलढाणा आयोजित राज्यस्तरीय ६वे बहुजन साहित्य संमेलन ३१मार्च २०२५रोजी सिंदखेड राजा या ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय वारसा असलेल्या नगरीत संपन्न झाले. याप्रसंगी नाशिकचे जेष्ठ कवी तसेच मविप्र समाज नाशिकचे सेवानिवृत्त प्रबंधक व निवृत्त सेवक संघाचे सचिव माणिकराव गोडसे यांना फुले शाहू आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.. कवी गोडसे यांना यापूर्वी पुणे विद्यापीठ गुणवंत सेवक, मविप्र समाज आदर्श सेवक, कादवा शिवार साहित्य मित्र, साहित्य रत्न, समाज भूषण, कवी कुसुमाग्रज, लोककवी वामनदादा कर्डक, कवी पी.सावळीराम असे विशेष राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

जिल्हा,राज्य व राष्ट्रीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी,प्रमुख अतिथ, कवी संमेलनाध्यक्ष म्हणून सतत सहभागी होत आहे. तसेच युवक बिरादरी आयोजित पुणे ते दिल्ली सायकल यात्री व वर्धा ते दांडी (गुजरात) दांडी स्मृती पदयात्री म्हणून सहभागी झाले आहेत. सदर पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे.
