
मोरेवाडी (प्रतिनिधी ) शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हे एक प्रभावी माध्यम आहे,असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडीचा माजी विद्यार्थी करण मोरे यांनी शाळेत आयोजित मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले. सर्वप्रथम मुख्याध्यापक गणेश बागुल यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेच्या वतीने केले. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुना आठवणींना उजाळा दिला व शाळेविषयी आपुलकी व्यक्त केली.समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने शाळेसाठी चांगले कार्य करण्याचा मनोदय ज्ञानेश्वर वाघ यांनी व्यक्त केला.याप्रसंगी करण मोरे,ज्ञानेश्वर वाघ,अरुण मोरे,रमेश पवार,सुभाष मोरे,राहुल मोरे,सोनाली दळवी,मोनिका पवार,साक्षी मोरे,सुनील मोरे चांदणी मोरे,विमल मोरे,दिपक मोरे,मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शितल मोरे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बागुल सर यांनी केले तर योगिता कापूरे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
