
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१६७ वा दिवस
ही पृथ्वी सर्व स्वर्गाहून श्रेष्ठ आहे; विश्वातील ही सर्वश्रेष्ठ पाठशाला आहे; तथाकथित उच्चतर जीव म्हणजे दिवंगत आत्मे होत आणि हे दुसरे तिसरे कोणी नसून नव्या शरीराचा स्वीकार केलेली माणसेच होत. यांचे शरीर सूक्ष्म असते हे खरे, परंतु तरीही हस्तपादादी अवयवयुक्त असे ते मानवी शरीरच असते. ते सुद्धा विचार करतात, त्यांना सुद्धा जाणीव असते आणि इतर सर्वदृष्ट्या ते आपल्यासारखेच असतात. तेव्हा तेही माणसेच असतात, देव आणि देवदूतही माणसेच असतात. परंतु, फक्त मनुष्यच ईश्वर होतो, आणि त्या सर्वांना ईश्वर होण्यासाठी पुनः मनुष्य व्हावे लागते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास ११ शके १९४७
★ माघ शुद्ध /शुक्ल १३/१४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ३१ जानेवारी २०२६
★ विश्वकर्मा जयंती
★ १९२० डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “मूकनायक” या पाक्षिकाचा पहिला अंक मुंबई येथून प्रकाशित केला
★ २००० सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक वसंत कानेटकर यांचा स्मृतीदिन
★ श्री महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सव प्रारंभ, कोल्हापूर.
