
मनमाड…( प्रतिनिधी).. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूल मध्ये आज हर३० जानेवारी २०२६ रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला.

सुरुवातीला विद्यालयाच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत सकाळी ११:०० वा . शासन आदेशान्वये दोन मिनिट स्तब्ध उभे राहून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली . हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाचे निमित्ताने थोर स्वांतत्र्य सेनानी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका शितल आहेर यांनी केले . शिक्षिका सुप्रिय घोरपडे यांनी विदयार्थाना महात्मा गांधी यांच्या बाबत माहिती दिली .

मुख्याध्यापिका यांनी विदयार्थ्यांसमवेत महात्मा गांधींजी यांचे आवडते भजन/प्रार्थना – रघुपति राघव राजाराम, पतित पावन सिताराम सादर केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसह शाळेतील परिसरात स्वच्छता करण्यात आली. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक बंधू-भगिनी उपस्थित होते.
