
नाशिक ता. ३० कवीतेतुन सखोल चितंनशिलतेची जाणीव होते. वाट्याला आलेल्या संघर्षाचे पडसाद कवितेतच उमटतात असे प्रतिपादन वैशाली जाधव यानी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात २२५ वे पुष्प गुफंताना वैशाली जाधव झाड शब्दांचे हिरवे या पुस्तकावर बोलत होत्या कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थानी जयश्री वाघ होत्या.
वैशाली जाधव पुढे म्हणाल्या की,जनाबाई माझ्या प्रेरणास्थान आहेत जनाबाई याच्या कवितानी मला जगण्याची प्रेरणा दिली.मनात खुप साचलेल असत पण व्यक्त होण्यासाठी आपल्या जवळ हक्काचा माणुस पाहिजे पण मला हक्काची मैत्रिणी भेटल्या शेती मातीत काम करताना आलेले जगण्यातले अनुभव कागदावर मारताना आपल्या भावना व्यक्त करताना होणाऱ्या वेदना आणि जीवनाच्या मैफिलीत एकटीच चाललेला प्रवास मला प्रेरणा द्या प्रेरणादायक ठरतो कधीकधी मी रुसून जाते माझ्यावरती रडता रडता हसून जाते.
माझ्यावरती
स्री मनाच्या भावभावनांचे चढ उतार आंतरिक कोलाहल या कवितांमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे
यावेळी अजित कुलकर्णी, वाळु आहेर या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
आभार अलकाताई दराडे यानी मानले तर सुत्रसचालन सुरेश पवार यानी केले.
दरम्यान ३ फेब्रुवारी रोजी श्रद्धा कराळे या वारली चित्र संस्कृती या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
